संत सेवालाल यांची २८२ वी जयंती पिरंगुट येथे साजरी

Share This News

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री संत सेवालाल यांची २८२ वी जयंती पिरंगुट, ता,मुळशी येथे मोठ्या उत्साहात, वाजत गाजत मिरवणूक काढून साजरी करण्यात आली. जयंती निमित्त तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय मंडळी उपस्थित होते.  बंजारा क्रांती दल संघटनेचे तालुका संस्थापक आणि भावना फाउंडेशनचे संस्थापक मा.सुनील राठोड यांच्या आवाहना नुसार मोठ्या संखेने तालुक्यातील सामाज एकत्र झाला होता.  बंजारा समाजातील आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाचे नवनवीन योजना तालुकास्तरावर राबविण्याचे काम उद्येाजक सुनील राठोड  हे गेली अनेक वर्षापासून करत आहेत. बंजारा समाजातील बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील असल्याचे सुनील राठोड यांनी या प्रसंगी संगितले. कार्यक्रमाचे आयोजन भावना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राठोड आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले.  यावेळी जि. प. सदस्य शंकरभाऊ मांडेकर,  शिवसेना नेते राम गायकवाड,  राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष विलास अमराळे,  कांग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे,  रामदास पवळे , राहुल पवळे, सचिन जेारी, युवराज राठोड, उपस्थित हेाते या वेळी संधटनेवर नवीन पदाधिकार्यांचे नियुक्ति सुनिल राठेाड यांच्या कडुन करण्यात आली तालुका प्रमुख पदी विठ्ठल जाधव,  उप- तालुका पदी दयानंद चव्हाण सचिव सुरेश पवार ,  महिला प्रमुख – देबाबाई चव्हाण यांची नियुक्ती  करण्यात आली यावेळी , भानुदास राठोड, विक्रम चव्हाण, रमेश चव्हाण , अक्षय राठोड,  सुनिल चव्हाण , संतोष  पवार ,  अजय चव्हाण , पंजाब जाधव , मोहन  पवार , संजय चव्हाण तुकाराम चव्हाण हे उपस्थित हेाते

छायाचित्र – सुनिल राठोड  यांच्या बरोबर  उपस्थित मान्यवर