“माणसाने देवाला प्रथम प्राधान्य द्यावे मग देवही त्याला प्राधान्य देईल”.प.पू सुधांशुजी महाराज.

Share This News

ईश्वराने माणसाला निर्माण केले आहे. त्यामुळे त्याचा सर्वात पहिला गुरु म्हणजे ईश्वर, त्यानंतर गुरु व गुरु द्वारे ईश्वराचे ज्ञान माणसाला मिळते. मात्र मनुष्य संसारात अडकून ईश्वरलाच विसरतो. मग ईश्वर त्याच्यावर कशी कृपा करणार ? मनुष्याने सर्व प्रथम आगदी सकाळी उठल्यावर हा दिवस दाखविल्या बद्दल आभार मानावे, जेवताना पहिला घास देवाला म्हणजेच अग्नी-पशू – पक्षी यांना अर्पण करावा. प्रत्येक कार्यात ईशस्मरण केल्यास ईश्वर त्या माणसास प्राधान्य देतो व कृपा करतो असे प्रतिपादन प.पू सुधांशुजी महाराज यांनी केले.विश्व जागृती मंडल पुणे यांनी आयोजित सत्संग – प्रवचन करताना ते बोलत होते. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विश्व जागृती मिशन पुणे मंडलचे अध्यक्ष घनश्याम झंवर, उपाध्यक्ष गणेश कामठे, महामंत्री विष्णु भगवान आगरवाल, संपर्क सचिव रविंद्रनाथ द्विवेदी आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.  

छायाचित्र : प.पू सुधांशुजी महाराज. .