विश्व जागृती मिशनच्या वतीने शोभयात्रा,गुरुपूजन,गुरुदर्शन व सत्संग संपन्न.

Share This News

विश्व जागृती मिशन पुणे मंडलच्या वतीने गुरुपौर्णिमे निमित्त प.पू सुधांशुजी महाराज यांची सुशोभित शोभा यात्रा सारसबाग चौक ते गणेश कला क्रीडा रंगमंच पर्यन्त काढण्यात आली यात बॅंड पथक,सुशोभित चित्ररथ, कलश घेतलेल्या महिला व नागरिक यांचा समावेश होता. मिरवणुकीनंतर गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प.पू सुधांशुजी महाराज यांचे पूजन व दर्शन करण्यात आले. यानंतर सत्संग कार्यक्रम(प्रवचन)झाला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हिंदू धर्मात अनेक देव असल्याचे मानले जाते. काहीजण यावर टिका देखील करतात मात्र या धर्मात देव एकच परब्रम्ह परमात्मा निराकार असून त्याच्या विविध शक्तींना वेग वेगळे देव मानले गेले जसे धन शक्ति म्हणजे लक्ष्मी, संहार म्हणजे शंकर, पालक म्हणजे विष्णु, निर्माता म्हणजे ब्रम्ह देव, मनुष्य गुरु मंत्र – ध्यान धारणा,नामजप  याद्वारे त्यांची कृपा प्राप्त करू शकतो असे प्रतिपादन केले. या कार्यक्रम प्रसंगी विश्व जागृती मिशन पुणे मंडलचे अध्यक्ष घनश्याम झंवर, उपाध्यक्ष गणेश कामठे, महामंत्री विष्णु भगवान आगरवाल, संपर्क सचिव रविंद्रनाथ द्विवेदी आदी मान्यवरांच्या बरोबरच भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते.  

छायाचित्र : प.पू सुधांशुजी महाराज.