बाल गंधर्व रंगमंदिरात झालेला कार्यक्रम हा एका निर्मात्याचा वाढदिवस – शशिकांत कोठावळे.

Share This News

कलाकारांना कोरोना काळात किट वाटप केले होते.त्याबद्दल कृतज्ञता म्हणून १ एप्रिल रोजी बालगंधर्व येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मात्र मनसे कसबा अध्यक्ष गणेश भोकरे यांनी तो बंद पडला.या कार्यक्रम विषयी चुकीची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली .असे कार्यक्रमाचे आयोजक शशिकांत कोठावळे यांनी माध्यमांना सांगितले.याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनेश भोसले यांनी प्रत्येक पक्ष आपल्या सेलच्या माध्यमातून कलाकारांचे प्रश्न मांडत असतो.मनसे कार्यकर्त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असे सांगितले.बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांनी या कार्यक्रमाचे चारमही वाटप झाले होते.नवीन नियमावलीनुसार सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे असे कळविले आहे