जागतिक महिलादिना निमित्त शांतीदूत परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर व शांतीदूत सेवारत्न पुरस्कार वितरण संपन्न.

Share This News

शांतीदूत परिवार, युनिटी हॉस्पिटल औंध, रोटरी क्लब औंध, छत्रपती प्रतिष्ठान औंध,यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबीर व विविध क्षेत्रांतील मान्यवर यांना शांतीदूत सेवारत्न पुरस्कार समारंभ संपन्न झाला. औंध येथील प्राचीन विठ्ठल मंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शांतीदूत परिवाराचे संस्थापक माजी विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. विठ्ठल जाधव, डॉ.विद्याताई जाधव,प्रमुख पाहुणे प्रा.अरुण आंधळे(रयत शिक्षण संस्था), युनिटी हॉस्पिटलचे डॉ.अमित काळे, माजी मुख्य अभियंता एमएसईबी प्रशांत साळुंखे, इक्विटासचे रिजनल मॅनेजर संजोग कोकणे, सुखानंद जोशी, माजी पोलिस अधिकारी शशिकांत राजहंस, माजी आयएएस अधिकारी बाजीराव जाधव, डॉ.प्रीती काळे(युनिटी हॉस्पिटल). प्रीती काळे(पुना मॅनेजमेंट असो). तृषाली जाधव(राष्ट्रीय अध्यक्षा शांतीदूत परिवार), रमेश पाचंगे(चौघडा वादक), आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील दिग्गज पुरस्कारार्थी उपस्थित होते. यात राज्य व देश पातळीवरील पुरस्कारार्थी ही समविष्ट्र होते. स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी बोलताना विठ्ठल जाधव यांनी रक्त बनवता यात नाही त्यामुळे रक्तदान हे जीवनदानच असते असे संगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोत्रे यांनी बहारदारपणे केले. 

छायाचित्र : मान्यवर व पुरस्कारार्थी यांचे समूह चित्र.