रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ.स्मिता जोग.

Share This News

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. स्मिता जोग यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष डॉ.मृणाल नेर्लेकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. सचिवपदी भारती डोळे यांची निवड करण्यात आली. वारजे येथील अविस्मरा हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रांतपाल मंजु फडके, सहाय्यक प्रांतपाल कल्याणी गोखले, आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी, सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.स्मिता जोग यांनी आगामी काळात एकांकिका स्पर्धा, आरोग्य जनजागृती, शिक्षण इत्यादी क्षेत्रांत विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.  

छायाचित्र : डॉ.स्मिता जोग