“रोटरी क्लब शिवाजीनगरचे लोकसेवा कार्य स्तुत्य”- प्रांतपाल मंजू फडके.

Share This News

रोटरी क्लब शिवाजीनगर हे रोटरीच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहे. मात्र त्यांचे विविध लोकोपयोगी प्रकल्प हे लोकसेवेत अग्रणी आहेत असे प्रतिपादन रोटरी प्रांत ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके यांनी केले. रोटरी क्लबच्या आढावा बैठकीत(डिजी व्हिजीट) त्या मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. अविस्मरा हॉल वारजे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल कल्याणी गोखले, रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्ष डॉ.स्मिता जोग, सचिव भारती डोळे, रो.विश्वास फडके आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधीकारी व रोटरी सदस्य उपस्थित होते.
छायाचित्र : डावीकडून भारती डोळे,स्मिता जोग,मंजू फडके,कल्याणी गोखले.