*शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ‘जिद्दारी’ चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा संपन्न* 

Share This News

संघर्ष, सस्पेन्स आणि प्रेमकथेचा मिलाफ  ‘जिद्दारी’ मध्ये दिसणार

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेती पिकली, शेतकरी जगाला तरच जगरहाट सुरू राहणार हे वास्तव आहे. मात्र शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य आणि  एक सुंदर प्रेमकथा यांचा उत्कट मिलाफ असलेल्या ‘जिद्दारी’  या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा आज पुण्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ए. आर. माइंडस प्रॉडक्शन प्रस्तुत ‘जिद्दारी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती दीप्ती जाधव शेंदारकर यांची असून लेखक – दिग्दर्शक अमोल आबासाहेब शिंदे होळकर आहेत. संगीत दिग्दर्शक  देव – सुचिर यांनी सुहास मुंडे, निखिल राजवर्धन यांच्या गीतांना संगीतबद्ध केले आहे तर ‘जिद्दारी’ मधील गीते  आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, सोनिया उपाध्याय, अतुल जोशी, राजलक्ष्मी शेंदारकर यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अमोल आबासाहेब शिंदे होळकर म्हणाले, ‘जिद्दारी’ म्हणजे जिद्द. हा चित्रपट शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करत असला तरी त्यामध्ये संघर्ष, सस्पेन्स आणि एक सुंदर अशी प्रेमकथा सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटात विदुला बाविस्कर, शुभम तारे, विजय अंजान, रवींद्र सोळंके, रवींद्र ढगे, सुधीर माले, राजश्री पठारे, जयश्री सोनवणे यांच्या भूमिका आहेत.

‘जिद्दारी’च्या निर्मात्या दीप्ती जाधव शेंदारकर म्हणाल्या, आमचा चित्रपट एक वेगळे कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये मराठवड्याची पार्श्वभूमी दाखवण्यात आलेली आहे.  चित्रपटाचे कार्यकारी निर्माता अभिजीत कांबळे आहेत,
संकलन अमोल निंबाळकर, पूजा पाटील यांनी केले आहे, तर  कला दिग्दर्शनाची जबाबदारी ज्ञानेश अ.  शिंदे, सूरज स.  शिंदे यांनी सांभाळली आहे. अजित पाटील एन्टरटेन्मेंट, सुरज संजय कदम यांचा विशेष सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.