आयईईई संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

Share This News

इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स (IEEE) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सेनापती बापट रोड येथील मराठा चेंबर्सच्या सभागृहात संपन्न झाली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेखा देशमुख, उपाध्यक्षपदी डॉ.अमर बुचडे, सचिवपदी प्रो.अभिजित खुरपे व खजिनदारपदी डॉ.मंदार भवाळकर यांची फेरनिवड करण्यात आली. प्रो अभिजित खुरपे यांनी गेल्या वर्षाचा लेखाजोखा मांडला. त्याला सर्वांनी मान्यता दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेखा देशमुख यांनी बोलतांना आगामी काळात विविध उपक्रम, संशोधन यासोबतच तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यात येईल असे प्रतिपादन केले. छायाचित्र : डावीकडून डॉ.अमर बुचडे, डॉ.सुरेखा देशमुख,श्री गिरीश खिलारी,प्रा.अभिजित खुरपे.