सहा वर्षात फक्त खराब रस्ते देणाऱ्या भाजप विरोधात शिवसेनेचे (ऊबाठा)आंदोलन.

Share This News

सहा वर्षात २५०० कोटी खर्च करून सुद्धा पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसत असून टेंडर मध्ये भ्रष्टाचार करून पुण्याची वाट लावणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात शिवसेना(ऊबाठा)च्या वतीने शहर प्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली शानिपार चौक बाजीराव रस्ता येथे उग्र आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी टेंडरची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली.आंदोलनात पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.